Useful Posts

Basketful of Moonlight."

 I tried to translate the poem from std 10 "Basketful of Moonlight."


हे चंद्रा,

दे मज चांदणे.

बी‌ज चांदण्यांचे

 दे भरुन एक दोन वाडगे.


शहराकडून माझ्या गावाकडे

येणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा,

मला पेरायचे छोटे छोटे

चंद्र आणि चांदणे.

सारा गाव जातोय शहराला,

उदरनिर्वाह करण्या कामाला.

परतीच्या वेळी होतो अंधार.

लांब आहे गाव माझे खूप,

रस्ता मात्र खडतर

विंचू साप असतात त्यावर.

जायला यायला ना गाडी ना घोडी

म्हणून होतो उशीर माझ्या बापाला.

येतो जेव्हा तो मी असते झोपलेली.

परत जातोय तो पहाटेच

असते तेव्हाही मी झोपलेली.

हे चंद्रा 

दे मला चांदणे वाडगाभर

उसंनवार म्हणून

मला करायचा अंधार रस्त्याचा लखलखीत

जेणे येतील माझे वडील घरला सुरक्षित

कारण मलाही एेकायाच्या

परिकथा नी गोष्टी त्याच्या

 हे चंद्रा

दे मला चांदणे वाडगाभर

पेरायच्या मला बिया चांदण्यांच्या

रस्त्याचा दुतर्फा.रस्त्याचा दुतर्फा.


प्रफुल्ल माहुरे,

महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदुर

No comments:

Post a Comment

Thanks for visiting. Share your views. Your suggestions are welcome.