शब्द शस्त्रे
प्रतिभेचं बोट धरून त्यानं
काव्यप्रांतातून अवगाहन केलं
शब्दांची मौक्तीके गोळा केली
सामाजिक क्रांतीच्या हेतूने !
पण शब्दांची फुलं झालीत
फुलांनी वार कसे करावेत
हा त्याला पडलेला प्रश्न
तो शोधू लागला मार्ग....!
सापडला मार्ग ,आता त्याने
फुलांचीच शस्त्रे करून....
घायाळ जखमांवर वार केला
क्रांती न करता ही......!
मात्र तो हताश झाला नाही
तो दिशादर्शक यंत्राप्रमाणे
फिरत राहिला ,सर्वत्र...
'माणूस 'शोधण्यासाठी......!
@सुभाष पाथ्रीकर
अकोला
Floral Weaponry
Holding excellence's finger
the woods of poetry he linger.
Picked the wordy pearl
For the revolt that's social.
But words turn'd flowers
How can they be attackers ?
Is the question.
He begins to get solution.
Found the way, now
Making weapons of flowers
On injuries, flowers he blows
Without revolution !
But he never became desperate
Like compass
he took on to rotate
For 'human' to locate....... !
Translated by
Prafulla Mahure
learningfacility.blogspot.com
Fantastic!
ReplyDeleteHats off to your poetic creativity.